22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयजदयूचे संपूर्ण युनिट भाजपमध्ये विलीन

जदयूचे संपूर्ण युनिट भाजपमध्ये विलीन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने जनता दल-युनायटेडला आणखी एक धक्का दिला. नितीश कुमार यांच्या पक्षाच्या दमण आणि दीव युनिटचे सोमवारी भाजपमध्ये विलीनीकरण झाले आहे. दमण आणि दीवमधील जद(यू) च्या १७ पैकी १५ जिल्हा पंचायत सदस्य आणि जद(यू) राज्याच्या संपूर्ण युनिटने काल भाजपमध्ये प्रवेश केला. नितीश कुमार यांच्या भाजप सोडण्याच्या निर्णयाविरोधात नेत्यांनी हे पाऊल उचलले आहेत.

बिहारमध्ये आम्ही विकासाला चालना दिली होती. मात्र, जदयूने बाहुबलीची निवड केली. त्यामुळे त्यांचे नेते आता नाराज झाले आहेत ट्विट करून भाजपने निशाणा साधला आहे. ट्विटद्वारे भाजपने खरपूस समाचार घेत म्हटले आहे की भाजप राज्याचा विकास करत असताना जदयूने आरजेडीसोबत जाऊन बाहुबल्यांना पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील जदयूचा एक मोठा आमदार भाजपमध्ये दाखल झाला होता आणि अलीकडंच मणिपूरमधील ७ पैकी ५ आमदार भाजपमध्ये दाखल झाले. गेल्या आठवड्यात जनता दलच्या (युनायटेड) पाच आमदारांनी भाजप पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मणिपूर विधानसभा सचिवालयानं दिलेल्या निवेदनानुसार, के. जयकिशन सिंह, नगुरसंगलूर सनाते, मोहम्मद अचब उद्दीन, थंगजम अरुणकुमार आणि एलएम खोटे यांनी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या