23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeराष्ट्रीयहाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना

एकमत ऑनलाईन

लखनऊ : हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला बलात्कार प्रकरणाचा तपास करुन, सात दिवसात अहवाल सादर करावा लागणार आहे. तसे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

हाथरस येथील बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात असंतोष निर्माण झाला. बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. नागरिकांमधील असंतोष आणि बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता योगी आदित्यनाथ यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकाला बलात्कार प्रकरणाचा पूर्ण तपास करुन आपला अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करावा लागणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

दरम्यान, पीडित तरुणीवर मंगळवारी (29 सप्टेंबरला) रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.कुटुंबियांनी तरुणीच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता. आमच्या इच्छेविरुद्ध पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. तर, पीडितेच्या कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबियांच्या परवानगीनंतरच पीडितेवर अंत्यसंस्कार केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

हाथरस पोलिसांचे स्पष्टीकरण
मध्यरात्री ३ वाजता पीडितेवर अंत्यसंस्कार झाले. पीडितेच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे. कुटुंबियांना घरात कोंडून अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मात्र कुटुंबाच्या परवानगीनंतरच अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लक्सर यांनीही कुटुंबाच्या परवानगीनंतरच अंत्यसंस्कार केले आणि कुटुंबिय सहभागी झाले होते असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचा आदित्यनाथांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. पंतप्रधानांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, असे म्हटल्याचे सांगत विशेष तपास पथक पुढच्या सात दिवसांत अहवाल देणार आहे, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवटीची मागणी
काँग्रेससह समाजवादी पार्टी, बसपा, आम आदमी पार्टी आणि भीम आर्मीसारख्या संघटना आणि पक्ष भाजप सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत.युपीत राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही निषेध केला.

‘तो’ आदेश कोणाचा ? :प्रियांका गांधी
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी गेले १४ दिवस सरकार कुठे होते? तातडीने कारवाई का केली नाही? असे विचारत पीडितेच्या कुटुंबियांकडून पार्थिव हिसकावून घेत अंत्यसंस्कार करण्याचा आदेश कोणी दिला असा सवाल विचारला आहे. राज्यातही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून योगी सरकारवर टीका करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्याय मागण्यासाठी एखादी नटीच पाहिजे का असा सवाल केला. तर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी योगी सरकार हे जंगलराज असल्याचा आरोप केला.

आरोपींना फाशीच हवी :आठवले
‘उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे दलित तरूणीवर झालेल्या अत्याचाराचा व हत्येच्या अमानुष घटनेचा मी निषेध करतो. हे अमानवीय कृत्य करणा-या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी.’ अशी मी मागणी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 

 

 

कृषी कायदा लागू करण्याचा आदेश ठाकरे सरकारकडून मागे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या