24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीययुरोपीय नागरिकांनाही भारतीय आंब्यांची भुरळ

युरोपीय नागरिकांनाही भारतीय आंब्यांची भुरळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय आंब्यांना परदेशात देखील खूप मागणी आहे हे आपण जाणतोच. दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा परदेशी पाठवला जातो. आतापर्यंत अमेरिका, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, शिकागो या भागात आंबा पाठवला गेला आहे.

मात्र आता युरोपातील देशांना देखील चवदार आणि रसदार भारतीय आंब्यांची चव चाखायला मिळणार आहे. नुकताच युरोपातील ब्रुसेल्स येथे मँगो फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते शुक्रवारी या फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले. त्यामुळे आगामी काळात भारतीय आंब्यांची चव युरोपातील देशांना चाखायला मिळणार आहे.

या फेस्टिव्हलमध्ये भारतीय आंब्यांच्या विविध प्रजाती होत्या. शिवाय भारतीय आंब्यांची चव चाखण्यासाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची देखील माहिती मिळते आहे. महोत्सवाला मिळालेल्या प्रोत्साहनानंतर युरोपीय युनियनमधील भारतीय राजदूतांनी येथील मार्केटबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.

या देशांमधून आंब्याला अफाट मागणी होईल असेही त्यांनी सांगितले आहे. भविष्यात युरोपियन बाजारात भारतीय आंबा विकला जाणार असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. त्यानिमित्ताने भारतीय आंबा उत्पादकांना ही फायदा होणार हे निश्चित.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या