34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeराष्ट्रीयटीएमसी नेत्याच्या घरी सापडले ईव्हीएम

टीएमसी नेत्याच्या घरी सापडले ईव्हीएम

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी उद्या दुस-या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दुस-या टप्प्यात एकूण ३० जागांसाठी मतदान होणार असून, यामध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

याचदरम्यान, उलुबेरिया मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या गौतम घोष यांच्या घरी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने एका सेक्टर अधिका-याला निलंबित केले आहे. त्याच्या घरी ईव्हिएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते़

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना दुस-या मतदारसंघातून निवडणूक दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ममता बॅनर्जी दुस-या मतदारसंघातून अर्ज भरणार असल्याची चर्चा सुरू असल्याचा टोला मोदींनी लगावला आहे.

आठवड्याचे लॉकडाउन परिणामकारक नाही; केंद्राने महाराष्ट्राला दिला होता सल्ला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या