24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयअग्निवीरांचे पॅकेज नेमके किती?

अग्निवीरांचे पॅकेज नेमके किती?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असून, उत्तरप्रदेश, बिहारपासून ते तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरपर्यंत १५ हून अधिक राज्यात या विरोधात हिंसक लाट उसळली आहे.

अग्निपथ योजनेंतर्गत भरती होणा-या तरुणांच्या पगाराची बरीच चर्चा असून, अग्निवीर आणि नियमित सैनिकांच्या पगारात नेमका फरक काय? याविषयीचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…

अग्निवीरांना मिळणारा पगार
प्रत्येक अग्निवीराला भरतीच्या वर्षात मासिक ३० हजार रूपये वेतन देण्यात येईल. त्यानंतर दुस-या वर्षी 33 हजार, तिस-या वर्षी ३६ हजार ५०० आणि चौथ्या वर्षी ४० हजार रुपये होईल. यातील ७० टक्के रक्कम वेतन म्हणून दिली जाणार आहे.

उर्वरित ३० टक्के रक्कम अग्निवीर कॉर्प्स फंड म्हणजेच सेवा निधी पॅकेजमध्ये जमा केली जाणार आहे. म्हणजेच पहिल्या वर्षी अग्निवीरांना दर महिन्याला २१ हजार, दुस-या वर्षी २३,१००, तिस-या वर्षी २५,५८० आणि शेवटच्या वर्षी २८,००० रुपये रोख वेतन दिले जाणार आहे.

चार वर्षांनंतर मिळणार ११.७१ लाख
चार वर्षांत वेतन कपातीतून एकूण बचत सुमारे ५.०२ लाख रुपये होईल. सरकारही तेवढीच रक्कम या निधीत टाकणार आहे. म्हणजेच पीएफप्रमाणे दुहेरी फायदा यामध्ये अग्निवीरांना होणार आहे. शिवाय या रकमेवर व्याजही मिळणार आहे. चार वर्षांत बचत आणि वेतन कपातीसह सरकारचे योगदान दोन्ही मिळून सुमारे ११.७१ लाख रुपये होईल. ही रक्कम करमुक्त असेल. अशा प्रकारे चार वर्षांनंतर अग्निवीराला मासिक वेतनाव्यतिरिक्त सेवा निधी पॅकेजमधून एकरकमी ११.७१ लाख रुपये दिले जाणार आहेत.

नियमित जवानांच्या पगाराचा नियम
सध्या सैन्यात अधिकारी ते जवानांना सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि इतर सुविधा दिल्या जातात. सैन्यात १७ हून अधिक प्रकारची पदे आहेत. सातव्या वेतन आयोगांतर्गत लष्करातील हवालदार आणि लान्स नाईक यांना दरमहा २१ हजार ७०० रुपये वेतन दिले जातात.

याशिवाय पगाराच्या २० ते ३० टक्के रक्कम पीएफ म्हणून जमा केली जाते. तसेच सैनिकांनाही वेळोवेळी नियमानुसार बढती दिली जाते. लान्स नायक पदानंतर नायक पदाचा क्रमांक लागतो. यामध्ये सैनिकांना २५ हजार ५०० रुपये वेतन दिले जाते. हवालदाराला २९ हजार २००, नायब सुभेदाराला ३५ हजार ४०० तर, सुभेदारांना ४४ हजार ९०० रुपये वेतन दिले जाते.

नियमित सैनिक आणि अग्निवीरांच्या पगारात कोणताही फरक नाही. अग्निवीरांचा पगार चार वर्षांसाठी पूर्वनिश्चित आहे, तर सातव्या वेतन आयोगांतर्गत नियमित सैनिकांच्या पगारात दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ केली जाते.

सेवेनंतरच्या सुविधांमधील फरक?
चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरला ११.७१ लाख रुपये एकरकमी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे, निवृत्त सैनिकाला ग्रॅच्युइटी म्हणून एकरकमी रक्कम मिळते. चार वर्षांनंतर अग्निवीराला कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा आदी सेवांचा लाभ घेत येणार नाही.

नियमित सैनिकांना सेवानिवृत्तीनंतरही कॅन्टीन, वैद्यकीय आदी सुविधांचा लाभ घेता येतो. याशिवाय सैनिकाला निवृत्तीनंतर आजीवन पेन्शनही मिळते. जे अग्निवीरांला मिळणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या