23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयजयपूरमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक

जयपूरमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक

एकमत ऑनलाईन

जयपूर : जयपूरमध्ये नीट परीक्षा २०२१ चा पेपर लीक झाल्याचे प्रकरणे समोर आले आहे. रविवारी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान जयपूरमध्ये पेपर लीक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर सकाळी २ वाजता सुरू झाला आणि पेपर २.३० वाजता व्हॉट्सऍपद्वारे लीक झाला. या संपूर्ण प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी उमेदवार धनेश्वरी यादवची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर इतरांना रिमांडवर घेण्यात आले आहे.

कोचिंग संचालक नवरत्न स्वामी हे जयपूरमधील या पेपर लीकच्या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीटच्या पेपर लीकचा हा व्यवहार ३५ लाख रुपयांमध्ये झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पेपर जयपूर येथील राजस्थान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी नीट परीक्षा केंद्रातून लीक झाला आहे.

३८०० हून अधिक परीक्षा केंद्रे
देशभरातील ३८०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या वर्षी नीट परीक्षेसाठी १६.१४ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. नीट युजी परीक्षा प्रथमच १३ भाषांमध्ये घेण्यात आली आहे. पंजाबी आणि मल्याळम या भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत, पश्चिम आशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुवेतमध्ये देखील नीट परीक्षेकरिता एक नवीन परीक्षा केंद्र उघडण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या