23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ

दिल्लीत बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पद बॅग सापडली. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. संशयास्पद बॅग मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. तसेच शॉपिंग कॉम्प्लेक्स रिकामे करण्यात आले आहे.

बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिस तपासात गुंतले असून वरिष्ठ अधिकारीही पोहोचले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्लीतील गाझीपूर भाजी मंडईच्या गेट क्रमांक एकच्या बाहेर बेवारस बॅग असल्याची बातमी मिळाली होती. नियंत्रण कक्षाला बेवारस बॅगची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या