Tuesday, October 3, 2023

राजकीय वर्तुळात खळबळ : भाजप आमदाराचा मृतदेह सापडला

कोलकाता: विरोधी पक्षात असलेल्या भाजपच्या एका आमदाराचा मृतदेह सापडल्यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवरून ही आत्महत्या असल्याचा जरी प्राथमिक अंदाज असला, तरी ही हत्या असल्याचा दावा स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूरमधल्या हेमताबादचे भाजप आमदार देवेंद्रनाथ रे यांचा सोमवारी मृतदेह सापडला. अवघ्या वर्षभरापूर्वीच भारतीय कम्युनिस्ट पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या देवेंद्रनाथ रे यांची हत्या झाल्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. देवेंद्र यांना आधी मारलं असून त्यानंतर ती आत्महत्या असल्याचं भासवण्याचा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

लटकलेल्या अवस्थेत आढळला भाजप आमदाराचा मृतदेह; हत्या झाल्याची शंका

उत्तर दिनाजपूर येथील एका दुकानाच्या बाहेर लटकलेल्या अवस्थेत आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. देबेंद्र नाथ रे हे हेमताबादचे आमदार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ही हत्या असल्याचे आरोप केले आहे. देबेंद्र नाथ रे यांच्या कुटुंबातील एका सदस्याने केलेल्या दाव्यानुसार, काही लोक मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी आले आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असावी असे सांगत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट केले असून ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे.

Read More  राजकीय वर्तुळात खळबळ : भाजप आमदाराचा मृतदेह सापडला

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या