16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयछावला गँगरपेच्या दोषींची फाशी रद्द

छावला गँगरपेच्या दोषींची फाशी रद्द

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील छावला येथे २०१२ मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या तिघांची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता करीत उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीही रद्द केली. तर्क आणि भावनेच्या आधारावर कोणाला शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असेही यावर सुनावणी देताना न्या. यु. यु. लळित यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने रवी कुमार, राहुल आणि विनोद यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला.
उत्तराखंडमधील एका मुलीवर १४ फेब्रुवारी २०१२ रोजी छावला येथे सामूहिक अत्याचार झाला होता. आरोपींनी तिला गाडीत बसवून दिल्लीबाहेर नेले होते. सामूहिक अत्याचारादरम्यान मुलीच्या अंगाला सिगारेटचे चटके देण्यात आले आणि चेह-यावर अ‍ॅसिड टाकण्यात आले.

ट्रायल कोर्टाने रवी, राहुल आणि विनोद यांना मुलीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

आतापर्यंत काय-काय घडले?
अनामिका (बदललेले नाव) ९ फेब्रुवारी २०१२ मध्ये रात्री नोकरीवरून परतत असताना आरोपींनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तरुणीचा १४ फेब्रुवारीला हरियाणातील रेवाडी येथे मृतदेह सापडला. तिच्यावर सामुहिक अत्याचारानंतर आरोपींनी तिची हत्या केली. तिच्या डोळ्यात अ‍ॅसिड टाकण्यात आले होते. याप्रकरणी राहुल, रवी आणि विनोद नावाच्या आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने २०१४ मध्ये तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. नंतर दिल्ली उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या