28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयव्यावसायिक सिलिंडरवरील सवलत रद्द

व्यावसायिक सिलिंडरवरील सवलत रद्द

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढत असून आता हा बोजा आणखी वाढणार आहे. देशातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिक सिलिंडरवर मिळणारी २०० ते ३०० रुपयांची सवलत आता बंद झाली आहे. त्यामुळे आता हे सिलिंडर कमी किमतीत मिळणार नाही.

व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणा-या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि एचपीसीएल आणि बीपीसीएल या तीन सरकारी तेल कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना ही सवलत बंद करण्यास सांगितले आहे. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०२२ पासून लागू करण्यात आला असून यासंदर्भात आदेशही आले आहेत. एचपीसीएलने १९ किलो आणि ४७.५ किलोच्या सिलिंडरसाठी नवी किंमत लागू केली आहे. तसेच इंडियन ऑइलने १९ किलो आणि ४७.५ किलोचे सिलिंडर ग्राहक आणि वितरकाला कोणत्याही सवलतीशिवाय विकले जावेत, असा आदेशही जारी केला आहे.

आयओसीच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी काढलेल्या पत्रातून हे स्पष्ट झाले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरवर सवलत देताना घरगुती एलपीजी सिलिंडरवरील तोटा भरून काढण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यामुळे किमतींच्या दरात असमानता दिसून येत होती. ती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तेलाच्या किमतींवरही परिणाम

या निर्णयामुळे वितरकांना सवलत म्हणून जी रक्कम दिली जात होती ती आता कमी होणार असल्याने तेलाच्या किमतीवरही त्याचा परिणाम दिसून येईल. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या किमती कमी झाल्याने ते तुमच्यासाठी स्वस्त होऊ शकतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या