26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयनोव्हाव्हॅक्स लसीच्या निष्कर्षाने उंचावल्या अपेक्षा

नोव्हाव्हॅक्स लसीच्या निष्कर्षाने उंचावल्या अपेक्षा

एकमत ऑनलाईन

मानवी चाचण्या सुरू, स्वयंसेवकाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अ‍ँटीबॉडीज

वॉशिंग्टन : मॉर्डना पाठोपाठ अमेरिकेत नोव्हाव्हॅक्स लस निर्मितीत वैज्ञानिक आघाडीवर आहेत. नोव्हाव्हॅक्सने कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित केली आहे. या लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांतील निष्कर्ष पुढे आले असून, ते अत्यंत समाधानकारक आहेत. त्यामुळे याबाबतच्या आशा उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या स्वयंसेवकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अ‍ँटीबॉडीज तयार होत असल्याचे आढळून आले, असे कंपनीचे म्हणणे आहे.

नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या प्रायोगिक लसीचे फेज १ चे मानवी चाचणीचे निष्कर्ष खूपच समाधानकारक आहेत. या रिझल्टसनी नोव्हाव्हॅक्सच्या लसीबद्दलच्या अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत. सीजीटीएन संकेतस्थळाने ही माहिती दिली. मागच्या आठवड्यात नोव्हाव्हॅक्स लसीच्या पहिल्या फेजचे निष्कर्ष समोर आले. लसीचे दोन डोस दिल्यानंतर तंदुरुस्त स्वयंसेवकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्या. कोरोनामुक्त नागरिकांच्या शरीरात आढळणा-या अँटीबॉडीजपेक्षा हे प्रमाण जास्त होते, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे या लसीबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ही लस लवकरच बाजारात येईल, असा दावाही कंपनीने केला आहे. सप्टेंबरच्या अखेरीस नोव्हाव्हॅक्सच्या तिस-या फेजच्या चाचण्या सुरू होतील. २०२१ या वर्षात एक अब्ज ते दोन अब्ज लसीचे डोस बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

अमेरिकेने कोरोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला १.६ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती. नोव्हाव्हॅक्सची लस यशस्वी होणे, भारतासाठीसुद्धा आनंदाची बाब आहे. कारण नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे. या करारामुळे नोव्हव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत. या करारामुळे सिरम भारतासाठी नोव्हाव्हॅक्सच्या लसीचे उत्पादन करणार आहे.

१८ ते ५९ वयोगटांतील स्वयंसेवकांवर चाचणी
१८ ते ५९ वयोगटातील तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली. त्यांना पाच आणि २५ मायक्रोग्रॅमचे दोन डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर कोणावरही गंभीर दृष्परिणाम दिसले नाहीत, असे नोव्हाव्हॅक्सने सांगितले. काही रुग्णांमध्ये सौम्य साइड इफेक्ट आढळून आले. यात इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मसल पेन अशा तक्रारी होत्या. त्याशिवाय दुसरा कसलाही त्रास झाला नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

पहिला डोस देताच अ‍ँटीबॉडीज तयार
पहिला डोस दिल्यानंतर सर्वांच्या शरीरात स्पाइक प्रोटीनला ब्लॉक करणारे अँटीबॉडीज तयार झाले. स्पाइक प्रोटीनच मानवी पेशींमध्ये घुसखोरी करतो. त्यामुळे रुग्णाची प्रकृती ढासळू लागते. व्हायरसला पेशींवर आक्रमण करण्यापासून रोखणा-या अँटीबॉडीज तयार झाल्या. २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला. त्यावेळी रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढली. नोव्हाव्हॅक्सचे हे संशोधन लवकरच मेडीकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होईल.

लस विकसित करताना किटकांमधील पेशींचा वापर
नोव्हाव्हॅक्स कंपनीने लस विकसित करताना किटकामधील पेशींचा वापर केला आहे. वैज्ञानिकांच्या या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, ही लस कोरोना रुग्णांसाठी परिणामकारक ठरेल, असा दावा नोव्हाव्हॅक्स कंपनीने केला आहे. कोरोना व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात १५० पेक्षा जास्त प्रकल्प सुरू आहेत.

लातूर : जिल्ह्यात आणखी २२८ रुग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या