34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयमोठ्या रेल्वे स्थानकांवर जाणे महागणार ?

मोठ्या रेल्वे स्थानकांवर जाणे महागणार ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रसरकारकडून देशातील काही मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना अतिरिक्त शुल्क लावण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. भारतीय रेल्वेतर्फे बहुतांश स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठीच हे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आगामी काळात शंभरहून अधिक रेल्वे स्थानकांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. बरीचशी कामे खासगी विकसकाच्या मदतीने करण्यात येणार असली, तरी रेल्वेतर्फे प्रवाशांकडून शुल्क आकारण्यात येण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सुत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्थानकानुसार हे शुल्क कमी-अधिक होण्याचीही शक्यता आहे. हे शुल्क साधारणत: १० ते ५० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या विविध प्रवासी श्रेणींनुसारही हे शुल्क वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते भारतीय रेल्वेतर्फे पहिल्या टप्प्यात १२० स्थानकांवर अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात येण्याची शक्यता आहे.

दिल्ली, मुंबई, नागपूरचा समावेश ?
प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणा-या स्थानकांमध्ये नवी दिल्ली, मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), नागपूर, तिरूपती, चंडीगड, ग्वाल्हेर आदींचा समावेश असण्याचा अंदाज आहे. संबंधित स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटही महागण्याची शक्यता आहे. प्रवाशांकडून आकारण्यात येणा-या तिकिटाच्या रकमेतच प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वसूल करण्यात येण्याचीही दाट शक्यता आहे, असे सुत्रांकडून समजते.

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ बार्शीत कडकडीत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या