26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीय५० जणांवर प्रयोग : भारतात स्वदेशी करोना लशीची पहिली मानवी चाचणी

५० जणांवर प्रयोग : भारतात स्वदेशी करोना लशीची पहिली मानवी चाचणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: संपूर्ण जग कोरोना लशीची वाट पाहत असताना भारताने या दिशेने एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. कोव्हॅक्सिनची (Covaxin) या करोनावरील देशी लशीची मानवी चाचणी भारतात सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल ३७५ स्वयंसेवकांना कोवॅक्सीन देण्यात येणार आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात १०० स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी घेण्यात येणार आहे. गुरुवारी एम्समधील पहिले कोवॅक्सीन दिले जाण्याची शक्यता आहे.

स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू होणे ही भारतातील कोरोनाविरूद्धच्या युद्धातील एक मोठी पायरी मानली जात आहे. कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीत मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी भाग घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यांपैकी ३७५ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांवर कोव्हॅक्सिनची चाचणी केली जाणार आहे. दिल्लीतील एम्समधे १०० स्वयंसेवकांवर मानवी चाचणी केली जाणार आहे, तर उर्वरित २७५ स्वयंसेवकांवर देशातील इतर केंद्रांवर ही मानवी चाचणी केली जाणार आहे.

एम्समधील चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या १०० स्वयंसेवकांपैकी केवळ पहिल्या ५० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. या चाचणीचे जर चांगले निकाल आले तर या चाचणीबाबतटा अहवाल डेटा कमिटीला पाठविला जाईल. या चाचणीनुसार जर सर्व काही ठीक असेल तर ही लस मग इतर स्वयंसेवकांना देखील दिली जाईल. गुरुवारी किंवा शुक्रवारी या आठवड्यात प्रथम मानवी चाचणी अंतर्गत प्रथम लस दिली जाईल असे सांगण्यात येत आहे.

या मानवी चाचणीत भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करण्यात आल्या आहेत असे एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी अशी माहिती देताना सांगितले. रणदीप गुलेरिया यांच्या माहितीनुसार, या मानवी चाचणीत १८ ते ५५ वर्षे वयोगटातील १०० निरोगी स्वयंसेवकांची पहिल्या टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात १२ ते ६५ या वयोगटातील स्वयंसेवकांवर मानवी चाचणी करण्यात येणार आहे, असे गुलेरिया म्हणाले.

हैदराबादच्या भारत बायोटेकने इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी संयुक्तपणे कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. या लसीचे सांकेतिक नाव (Cone Name) बीबीव्ही-152 आहे. या लशीमुळे केंद्र सरकारही अतिशय समाधानी आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत नुकतेच ट्विट केले आहे. स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु झाली. आता कोवीड १९ च्या विरूद्ध ही लढाई निर्णायक अवस्थेत आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटद्वारे दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस विकसित करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक संकेत मिळत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. आपल्याला लवकरच या साथीवर पूर्ण विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read More  औरंगाबाद जिल्ह्यात 179 रुग्णांची वाढ; 4720 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या