28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोटके सापडली

केरळमध्ये पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोटके सापडली

एकमत ऑनलाईन

कोझिकोड : केरळमधील कोझिकोड रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू एक्सप्रेसमध्ये ११७ जिलेटिन स्टिक आणि ३५० डिटोनेटर सापडले आहे. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू एक्सप्रेस मध्ये ही स्फोटके सापडली. एक्सप्रेसमध्ये स्फोटके सापडल्यानंतर संशयित प्रवासी महिलेला अटक करण्यात आली असून, ही महिला तामिळनाडूची असल्याचे समजते. एक्सप्रेसमध्ये महिलेच्या सीटखालून स्फोटके जप्त करण्यात आली. यावेळी विहीर खोदण्याच्या उद्देशाने तिने जिलेटिनच्या कांड्या आणल्या असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलिस या महिलेची कसून चौकशी करत आहेत.

डियर नीता भाभी और मुकेश भैय्या ये तो सिर्फ ट्रेलर है ; अंबानींना पत्राद्वारे धमकी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या