25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयपंतप्रधानांच्या दौ-यापूर्वी स्फोटके जप्त

पंतप्रधानांच्या दौ-यापूर्वी स्फोटके जप्त

एकमत ऑनलाईन

राजकोट : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यावर आहेत. आज दुपारी त्यांचा राजकोटमध्ये कार्यक्रमही आहे. त्यांच्या कार्यक्रमापूर्वी राजकोट पोलिसांनी आजी धरणाजवळून १६०० जिलेटिनच्या कांड्या आणि ब्लास्टिंग कॅप जप्त केल्या आहेत. स्टोन क्रशर कारखान्यातून ६ ऑक्टोबरच्या रात्री या वस्तू चोरीला गेल्या होत्या. मात्र, आजतागायत चोर सापडलेले नाहीत.

६ ऑक्टोबरच्या रात्री लापसरी परिसरात असलेल्या एका स्टोन क्रशर कारखान्याच्या मालकाने त्याच्या कारखान्यातून १६०० जिलेटिनच्या कांड्या आणि ब्लास्टिंग कॅप गायब झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. एवढ्या मोठया प्रमाणात कांड्या व ब्लास्टिंग कॅप चोरीला गेल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. राजकोट पोलिस आणि एटीएसचे पथक त्याचा शोध घेण्यात व्यस्त होते. रविवारी रात्री हे साहित्य आजी धरणाजवळून सापडले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या