कोची : भारत पुढच्या पाच वर्षात सागरी उत्पादनाच्या निर्यातीत दुप्पट वाढ करणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी दिली. सध्या जवळपास ५० हजार कोटी रुपयांची निर्यात भारताकडून होते.
पुढच्या पाच वर्षाच ही निर्यात १ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य भारताचे असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. शाश्वत मासेमारी, नवनवीन प्रजाती आणि गुणवत्ता, कोस्टल शिपिंग आणि मत्स्यपालनाला चालना दिली जाणार आहे.