25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयआयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली

आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली

एकमत ऑनलाईन

नवी, दिल्ली : कोरोनामुळे अनेक उद्योग आणि काम बंद असल्यानं ITR कसा भरायचा हा प्रश्न अनेक करदात्यांसमोर उभा होता. सध्याची स्थिती विचारात घेऊन सीबीडीटीकडून आयकर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कर भरण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख देण्यात आली होती. ही मुदत सीबीडीटीकडून वाढवण्यात आली असून आता 30 डिसेंबरपर्यंत आयकर भरता येणार आहे. कोरोना काळात या निर्णयामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सीबीडीटीने २०१८-१९ (एवाय २०१९-२०) साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवली आहे. यापूर्वी प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी ३१ जुलै २०२० ही अंतिम तारीख होती. मात्र आता ही मुदत वाढवून ३० सप्टेंबर २०२० पर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी दोनदा आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे.

आयकर विभागानं या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या या निर्णयामुळे हजारो करदात्यांना मोठा दिलासा आणि ITR भरण्यासाठी मुदत मिळाली आहे.

आर्थिक वर्ष 2018-19 ((AY 2019-20) )साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगामुळे आणि लॉकडाऊनमुळे कर भरण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन त्यांना ITR भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ CBDTकडून देण्यात आली आहे.

Read More  संपादकीय : यम हवा की संयम?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या