23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयनितीश-तेजस्वी सरकारचा १६ ऑगस्टला विस्तार?

नितीश-तेजस्वी सरकारचा १६ ऑगस्टला विस्तार?

एकमत ऑनलाईन

पाटना : बिहार मध्ये नव्याने तयार झालेल्या सरकार मधील खाते वाटपावर महागठबंधन मध्ये एक मत झाल्याचे समजत आहे, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात बंद खोलीत झालेल्या चर्चे नंतर एक मत झाले आहे, सांगितल जात आहे की १६ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार होवू शकतो. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे दिल्लीत युती मधील घटक पक्षांच्या अध्याक्षांना भेटण्यासाठी गेले होते. तेजस्वी यादव यांनी सांगितल की मंत्रीपदा बाबत सगळ ठरल आहे. कोणाला कोणत खात मिळणार आहे,आणि केणत्या पक्षाला किती खाती मिळणार आहेत.

नविन सरकार मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शप्पथ घेतली आहे. आणि १६ ऑगस्टला इतर नेते शप्पथ घेणार आहेत. तेजस्वी यादव यांनी जेव्हा दिल्ली दौरा केला तेव्हा ते .सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही, इतर सगळ्या घटक पक्षांची घेतली होती. ते जेव्हा बिहारमध्ये परतल्या नंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले लवकरच सगळ्या गोष्टी समोर येथील, थोडी वाट पाहा.

तसेच त्यांनी केंद्र सरकार वर जोरदार टिका केली ते म्हणाले मी १० लाख नोकरी देणार म्हणटल्यावर टीका झाली, आणि ते तर म्हणाले होते आम्ही १० करोड रोजगार देणार त्याच काय झाल, ते देतात का नोकऱ्या का नाहीत, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार द्यायचा होता. आता आठ वर्षे झाली. १६ कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे का? नितीश कुमार यांच्या नवीन सरकारमध्ये जास्तीत जास्त ३६ मंत्री असू शकतात. मात्र, आता २५ ते ३० मंत्र्यांनाच जागा देता येणार आहे. उर्वरित मंत्रीपदे नंतर भरली जातील. उर्वरित मंत्रीपदे नंतर भरली जातील. ७९ आमदारांसह विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या