19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयकर्ज प्रकरणात मुदतवाढ अधिकाराचा मुद्दा नाही

कर्ज प्रकरणात मुदतवाढ अधिकाराचा मुद्दा नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम भरताना कर्जदार आणखी मुदतवाढीचा दावा करू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केले.

न्या. एम. आर. शहा आणि न्या. कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी देताना हे निर्देश देताना पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने मार्चमध्ये दिलेला निकाल रद्दबातल ठरविला. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कर्जदार कंपनीला व्याजासह कर्जाची रक्कम बँकेकडे भरण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी दिला होता. वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत अशाप्रकारची मुदतवाढ देणे घटनाब असून राज्यघटनेतील २२६ व्या कलमाचा विचार केला असता त्याला परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. भारतीय करार कायद्यातील ६२ व्या कलमानुसार याआधी झालेल्या करारामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करायची असेल तर त्याला दोन्ही घटकांची सहमती लागते.

राज्यघटनेतील २२६ वे कलम हे काही विशिष्ट विषयांच्याबाबतीत उच्च न्यायालयांना दिलेल्या अधिकाराशी संबंधित आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले. याप्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात ‘एसबीआय’ने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. बँकेने कर्जदाराच्या हिताचा विचार करूनच हे कर्ज मंजूर केल्याचे दिसते. बँकेने ‘ओटीएस’ची ऑफर दिल्यानंतर कर्जदाराने ती स्विकारल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या