27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयट्रम्प दौ-यावेळी मोदी सरकारची उधळपट्टी

ट्रम्प दौ-यावेळी मोदी सरकारची उधळपट्टी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ट्रम्प त्यांच्या पहिल्या भारत दौ-यावर त्यांची पत्नी मोनालिसा, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर आणि अनेक अधिका-यांसह २०२० मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी अहमदाबाद, आगरा आणि दिल्लीचा दौरा केला होता. या दौ-यादरम्यान भारताने भला मोठा खर्च केला होता. माहिती अधिकाराच्या माध्यमातून याबाबतची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

विदेश मंत्रालयाने केंद्रिय सूचना आयोगाला एका आरटीआय अर्जाच्या उत्तरात याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे २०२० मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या शासकीय दौ-याचा आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा एकूण खर्च ३८ लाख रुपये आला होता. मोदी सरकारने एकंदरीत चाळीस लाखांची उधळपट्टी ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौ-यावर केली होती. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती ट्रम्प त्याच्या संपूर्ण परिवारासह आणि काही अधिका-यांसह पहिल्यांदा भारत दौ-यावर आले होते. मोदी आणि ट्रम्पचे मैत्री संबंधही चांगले होते. अहमदाबाद मध्ये ट्रंपमध्ये पोहोचल्यावर मोठ्या जनसमुदायाला संबोधितही केले होते. या दौ-यात त्यांनी पाकिस्तानचाही संदर्भ काढला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या