36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयइतिहासाच्या पुस्तकात मोघलांचे तथ्यहिन कौतूक

इतिहासाच्या पुस्तकात मोघलांचे तथ्यहिन कौतूक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एनसीईआरटीच्या १२ वीच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकातील मजकुरावरुन इंटरनेटवर वादावादी सुरु झाली आहे. १२ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री पार्ट-टू मध्ये दिलेल्या मजूकरानूसार मोघल शासकांनी भारतातील मंदीरे युद्धादरम्यान पाडली, मात्र ती बांधण्यासाठी मदतही केली होती, असे छापले आहे. मात्र एका माहितीअधिकार कार्यकर्त्याने याबाबत त्यांना विचारणा केली असता आपल्याकडे याबाबत काहीही माहिती नाही, असे उत्तर दिले आहे. त्यावरुन इंटरनेटवर वाद सुरु झाला आहे.

मोघल शासकांकडून युद्धाच्या दरम्यान मंदिरांना पाडले जाणे आणि त्यानंतर त्याची दुरुस्ती केली गेल्याप्रकरणी शिवांक वर्मा यांनी एनसीईआरटीकडे माहितीच्या अधिकारातून माहिती मागवली होती. मात्र उत्तरादाखल दिलेल्या माहितीत आपल्याकडे याची काहीच माहिती नसल्याचे कबुल केले आहे. त्यापार्श्वभुमीवर जर एखाद्या दाव्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे हातात नसतील तर कोणत्या आधारावर अशी चुकीचे ज्ञान विद्यार्थ्यांना शिकविले जाते, अशी विचारणा नेटक-यांनी सुरु केली आहे. इतिहासाच्या पुस्तकात कशाच्या आधारे इतिहास शिकवला जातोय?अशी विचारणाच शिक्षण क्षेत्राशी निगडीत डॉ. इंदु विश्वनाथन यांनी ट्विटावरुन केली आहे.

एनसीईआरटीच्या पुस्तकातील एका परिच्छेदात जेव्हा युद्धाच्या दरम्यान मंदिरांना पाडण्यात आले होते, त्यानंतर शाहजहान आणि औरंगजेबने या मंदिरांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत दिल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात औरंगजेब आणि शाहजहान यांनी किती मंदिरांची दुरुस्ती केली होती?असा सवाल विचारला होता. मात्र त्यावर आम्हाला काहीच माहित नाही,असे उत्तर एनसीईआरटीकडून देण्यात आले आहे. ट्विटरवर मुघल व एनसीईआरटी ट्रेंड आरटीआयवरील एनसीईआरटीच्या या उत्तरानंतर ट्विटरवर मुघल हा शब्द ट्रेंड होत आहे. तसेच एनसीईआरटी देखील ट्रेंड होत आहे. यावरुन सध्या सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहे.

कायदे रद्द करण्यास भाग पाडू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या