23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयसत्तेच्या ‘पीच’वर पुन्हा फडणवीस!

सत्तेच्या ‘पीच’वर पुन्हा फडणवीस!

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेतील बंडातून राजकीय भूकंप घडवून आणत कुरघोडीच्या राजकारणात आजघडीला सरस ठरलेले विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ४८ तासांत राजकीय भाष्य टाळले. पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विटही त्यांना काही सेकंदात डिलीट करण्यास फडणवीस यांनीच भाग पाडले. अर्थात, त्यांचे हे मौन बोलके ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काही तासांतच राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेची खेळी फडणवीस खेळणार हे स्पष्ट दिसते आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा पत्त्याचा बंगला हलवून विधान परिषदेनंतर तो कोसळणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यांचे हे सूचक विधान शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीतून खरे झाले. शिंदे आणि त्यांची साथ देणा-या तीन डझन आमदारांना सुरत व त्यानंतर गुवाहाटीत हलवून सत्तेच्या नव्या बंगल्याची पायाभरणी फडणवीस यांनी मजबूत करून ठेवली.

शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे सरकार गडगडणार असल्याचे गृहीत धरून विरोधी बाकावरील भारतीय जनता पक्षाने थेट सरकार स्थापनेच्या हालचाली वाढवत, नवी रणनीती आखली. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सामावून घेण्यापासून नव्या सरकारचा शपथविधी, मंत्रिमंडळाचे स्वरूप, ते चालविण्याचे सूत्र, नव्या सरकारमधील वाटाघाटी आदी मुद्यांवर भाजप नेत्यांमध्ये अंतिम चर्चा सुरू आहे.

भविष्यातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत फडणवीस यांनी बैठका घेतल्या. ‘सागर’ बंगल्यावर बसून सूत्रे हलविणा-या फडणवीस यांची भेट घेऊन भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या. परिणामी, भाजपच्या गोटात आतापासूनच उत्सवाला प्रारंभ झाल्याचे दिसत आहेत.फडणवीस हे सकाळपासून ‘सागर’ या बंगल्यावर होते. तेव्हा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांच्यासह काही आमदारांची त्यांची भेट घेतली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या