24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयनीट परीक्षेत अनुत्तीर्ण; विद्यार्थिनीची आत्महत्या

नीट परीक्षेत अनुत्तीर्ण; विद्यार्थिनीची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नोएडा : दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सेक्टर १५१ येथील अमन सोसायटीमध्ये नीट परीक्षेत नापास झालेल्या एका विद्यार्थिनीने सातव्या मजल्यावरून उडी मारली. एवढ्या उंचीवरून पडून २० वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नीट परीक्षेच्या निकालात नापास झाल्यामुळे विद्यार्थिनीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीचे कुटुंब टॉवर ५ मध्ये राहते, तर मुलीने ७ व्या टॉवरवरून उडी मारली आहे. यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने बुधवारी देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षाचा निकाल जाहीर केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या