30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयमध्यप्रदेशमधील मृत्यूची आकडेवारी फसवी?

मध्यप्रदेशमधील मृत्यूची आकडेवारी फसवी?

एकमत ऑनलाईन

भोपाळ : कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशभरात झपाट्याने वाढू लागली आहे. मध्य प्रदेशमध्येही परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. मात्र सरकारकडून मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशमधील कोरोनामुळे मृत्यूंची सरकारी आकडेवारी व प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असल्याची शंका निर्माण झाली आहे. मध्य प्रदेशमधील अंत्यसंस्कार होत असलेल्या मृतदेहांबाबतच्या एका फोटो व व्हिडिओतून त्याबाबत खुलासा होत आहे.

व्हायरल होत असलेला फोटोवरून भोपाळमधील मृतदेहांच्या संख्येबाबतची विदारक परिस्थिती समोर येत आहे. व्हिडिओत भोपाळच्या भदभदा विश्राम घाट येथे ४० चिता जळताना दिसत आहेत. प्रशासनाने मात्र गुरुवारी कोरोनामुळे केवळ ४ मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. प्रसिद्ध केलेला हा फोटो ड्रोनच्या माध्यमातून घेतलेला आहे. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे.

भोपाळमध्ये सरकारचे आकडे आणि प्रत्यक्ष समोर येणारे आकडे यांच्यात मोठी तफावत असल्याचा दावा या वृत्तात केलेला आहे. प्रशासनाने कोरोनाची लागण होणा-या रुग्णांचे आकडे लपवले आणि आता मृत्यूची आकडेवारीही लपवत असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. मीडिया अहवालानुसार कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जात असूनही आकडे वेगळे येत आहेत. प्रत्यक्ष आकडा आणि प्रशासनाची आकडेवारी यात मोठी तफावत असली तरी या फोटोमधून समोर येणारे वास्तव हे अत्यंत भयाण आणि काळीज चिरणारे असे आहे.

२४ तास ऑक्सिजन निर्मिती, वाहतूक करा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या