19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयकुटूंबाने किटकनाशक घेतले : दलित शेतक-याला पोलिसांची अमानुष मारहाण

कुटूंबाने किटकनाशक घेतले : दलित शेतक-याला पोलिसांची अमानुष मारहाण

एकमत ऑनलाईन

पण माय बाप सरकारला दया नाही आली : एवढं पीक आलं की घ्या जमीन..पण पीकावर जेसीबी नका चालवू म्हणून कुटूंबियांचा आक्रोश

मध्यप्रदेश : लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. केंद्रातील सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे. लोकांच्या हाताला काम नसल्याने पोटाला टिचभर भाकरही शेजारी देण्यासाठी पुढे येत नाहीत, प्रत्येकाला कोरानाची भीती आहे मात्र याच दरम्यान, मध्यप्रदेशात सध्या शिवराजसिंह इस्तिफा दो असा ट्रेडसुरू झाला आहे. लोकांमध्ये प्रचंड राग आहे. त्याला कारणही तसेच आहे. मध्यप्रदेश मधील गुना जिल्ह्यातील जगनपुर भागात वाट्याने शेती करणा-या एका दलित शेतक-याला आणि त्याच्या पत्नीला सायन्स कॉलेजसाठी देण्यात आलेली जमीन खाली करण्यासाठी पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली.


या दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा पहायला मिळाला. ओ साहेब, दोन लाखांचं कर्ज काढलंय; एवढं पीक झाल्यावर घ्या ना जमीन..!! असा आक्रोश एकला असता तर कोणत्याही माणसाला पाझर फुटला असता…मारहानीनंतर मात्र ज्यावेळी सगळ असह्य झाल तेव्हा राजकुमार अहिरवार असं पीडित शेतक-याचं नाव असून त्याला आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर दोघांनीही कीटकनाशक पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून दोघांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

जेसीबी चालवून शेत उध्वस्त करण्यात आलं

राजकुमार कसत असलेली जमीन त्यांना वाट्याने करण्यासाठी देण्यात आलेली आहे. या जमिनीत कष्ट करुन काहीतरी उगवावं या हेतूने त्यांनी पेरणी केली होती, आणि चांगलं पीकही उगवून आलं होतं. मात्र सदर जागा कॉलेजसाठी प्रस्तावित असल्याचं सांगत पोलिसांकडून जेसीबी लावून या शेतातील पिकांचं नुकसान करण्यात आलं. लहान मुलांसारख जपलेल्या पिकाला शेतकरी हात लाऊ देत नव्हते. लहान मुलांचा आक्रोश या ठिकाणी पहायला मिळाला. ‘यंदा कर्ज काढून शेत पिकवलय साहेब, एवढं पीक आलं की घ्या जमीन..आता जेसीबी चालवू नका’ अशी आर्त विनवणी करणाºया राजकुमारला आणि त्याच्या पत्नीला न जुमानता याठिकाणी जेसीबी चालवून शेत उध्वस्त करण्यात आलं.

पोलिसांनी हे पाऊल उचलल्यानंतर संतापलेल्या राजकुमार यांनी पोलिसांशी हुज्जत घातली तेव्हा पोलिसांकडून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचं चित्रीकरणही लोकांनी केलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीनंतर राजकुमार आणि त्यांच्या पत्नीने शेतशेजारील झोपडीत (राहत्या घरात) ठेवलेलं तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या शेतकरी दाम्पत्याला ६ लहान मुलं असून औषध पिल्यानंतर या मुलांनी आईबापाला कवटाळून बसत आपला आक्रोश व्यक्त केला.

Read More  राजा की आएगी बारात : गुन्हेगार पकडण्यासाठी बिहारमध्ये अनोखी स्टाईल

म्हणे शेतक-यांनी अरेरावी केल्याने पोलिसांना लाठी चालवावी लागली

स्थानिक तहसीलदार निर्मल राठोड यांच्या मते, शेतकºयांनी अरेरावी केल्याने पोलिसांना लाठी चालवावी लागली. दरम्यान या प्रकारामुळे देशभरातील नागरिकांकडून मध्यप्रदेश पोलिसांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवराजसिंग चौहान यांच्या राज्यात अशा प्रकारचा गुंडाराज पोलिसांकडून चालवला जात असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी #शिवराज_सिंह_ इस्तीफा_ दो’ हा ट्विटर ट्रेंडही चालवला जात आहे.

दलित शेतकºयांना मारहाण:  पोलिसांची क्रौर्यता

# मध्यप्रदेशात दलित शेतक-यांना मारहाण; पोलिसांची क्रौर्यता
# शिवराजसिंह चौहान
# शिवराज_सिंह_इस्तिफा_दो
         -राहुल गांधी, कॉग्रेस नेते

क्रूर… क्रूर…लाठीमार

हे शिवराज सरकार कोठे राज्य घेतेय?
हा कोणत्या प्रकारचा वन नियम आहे?
गुनातील कॅन्ट पोलिस स्टेशन परिसरातील दलित शेतकरी जोडप्यावर मोठ्या संख्येने पोलिसांकडून असा क्रूर लाठीमार.
-कमलनाथ

ही घटना अत्यंत र्दुदैवी

कॉलेजसाठी जागा मंजूर होऊन बरेच दिवस झाले असून आता कॉलेज बांधलं नाही तर ते दुसºयाठिकाणी हलवलं जाईल. शेतकरी दाम्पत्याने कीटकनाशक पिलं ही दुदैर्वी घटना असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी एस. विश्वनाथन

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या