34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय शेतकरी आंदोलनप्रश्नी चर्चा व्हायला हवी

शेतकरी आंदोलनप्रश्नी चर्चा व्हायला हवी

नितीश कुमार : गैरसमजातून आंदोलनाचा दावा

एकमत ऑनलाईन

पाटणा : सध्या कृषि कायद्यांविरोधात शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. यावरुन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी चर्चा व्हायला हवी असे मत त्यांनी मांडले आहे. केंद्र सरकार खरेदी यंत्रणेशी संबंधित मुद्यांची भीती दूर करण्यासाठी, शेतक-यांशी चर्चा करू इच्छित आहे. त्यामुळे मला वाटते की चर्चा व्हायला हवी. गैरसमजांमुळे आंदोलन सुरू आहे. असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान मोदींसह भाजपावर जोरदार टीका केली जात आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

बायकोच्या इच्छेसाठी बाईक चोरल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या