28.9 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय शेतक-यांची दिल्लीत कुच

शेतक-यांची दिल्लीत कुच

 शेतकरी-पोलिस संघर्षानंतर आंदोलनास परवानगी;  दिल्लीत शेतकरी आंदोलन दडपण्याचे प्रयत्न

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतक-यांना अखेर दिल्लीत प्रवेश मिळाला आहे़ शुक्रवार दि़ २७ नोव्हेंबर रोजी पोलिस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतक-यांना दिल्लीच्या बुराडी स्थित निरंकारी मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे़ परंतु, या मैदानाच्या बाहेर कुठेही जाण्यास आंदोलकांना मज्जाव करण्यात आला आहे. या दरम्यान पोलिसांची नजर शेतक-यांवर कायम राहणार आहे.

आंदोलक शेतक-यांकडून दिल्लीतील जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली जात होती. जवळपास ५ लाख आंदोलकांचा यात सहभाग असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले. अशात दिल्लीत दाखल झाल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला होता. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने दिल्लीकडे निघालेल्या देशभरातील शेतक-यांना विविध राज्यांच्या सीमांवर अडविण्यात येत आहे. अनेक शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. किसान सभेच्या केंद्रीय नेत्यांना अटक केले जात आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांच्या वतीने किसान सभा तीव्र शब्दात निषेध करत आहे.

देशभरातील शेतक-यांमध्ये सरकारच्या या धोरणांच्या विरोधात प्रचंड असंतोष खदखदतो आहे. शेतक-यांवर दडपशाही करून हा असंतोष संपविता येणार नाही. शेतक-यांशी चर्चा करून व त्यांच्या मागण्या मान्य करूनच यावर मार्ग काढता येईल. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घ्यावी, दडपशाही थांबवावी व शेतक-यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन किसान सभा करत आहे.

शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष
शुक्रवारी सिंधू सीमेवर शेतक-यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांकडूनही वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या अगोदर दिल्लीत दाखल होण्याचा प्रयत्न करणा-या आंदोलकांची संख्या पाहता दिल्ली पोलिसांनी सरकारकडे ९ स्टेडियमला तुरुंगात परिवर्तित करण्याची परवानगी मागितली होती.

मोठ्याप्रमाणात शेतकरी दिल्लीत दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत लोकांना मोठ्या संख्येत एकत्र येण्यावर तसेच, विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे़ दुसरीकडे आंदोलक मात्र महिनाभर पुरेल एवढी अत्यावश्यक साधनसामग्री घेऊनच दिल्लीत दाखल झाले आहेत.

शेतक-यांना ३ डिसेंबर रोजी चर्चेचे आमंत्रण
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने शेतक-यांना ३ डिसेंबर रोजी चर्चेचे आमंत्रण दिले आहे़ विरोधकांकडून शेतक-यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

केंद्राने ताबडतोब शेतक-यांशी संवाद साधावा
शेतकरी कायद्याविरोधात देशात शेतकरी आक्रमक झाले असून, शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकार दडपशाहीचे हत्यार वापरत आहे, असे सांगत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केंद्राने ताबडतोब शेतक-यांशी संवाद साधावा, अशी मागणी केली आहे.

कोरोनाचे सर्व नियम अंमलात आणणार
आपण कोरोनाच्या गाईडलाईन्सहीत इतर नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचेही शेतक-यांनी आश्वासन दिले आहे़ निरंकारी मैदानातही मास्कसहीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत शेतक-यांचे आंदोलन सुरू राहणार आहे.

शेतक-यांना कोणीच रोखू शकत नाही : राहुल गांधी
पंतप्रधानांनी लक्षात ठेवायला हवं जेव्हा अहंकाराचा सत्याशी सामना होतो, तेव्हा अहंकाराचाच पराभव होतो. सत्याच्या या लढाईत उतरलेल्या शेतक-यांना जगातील कोणतेच सरकार रोखू शकत नाही. मोदी सरकारला शेतक-यांचे ऐकावो लागेल आणि काळे कायदे मागे घ्यावेच लागतील. ही तर फक्त सुरुवात आहे, असे ट्विट काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केले आहे.

लस घेणार नाही: बोलसोनारो

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या