32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयफास्टॅगमुळे वार्षिक २० हजार कोटींची बचत

फास्टॅगमुळे वार्षिक २० हजार कोटींची बचत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महामार्गावर फास्टॅग बंधनकारक करण्यात आल्याने देशाला खूप मोठा फायदा होणार आहे. इंधनावर दरवर्षी २० हजार कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे आणि महसुलात जवळपास १० हजार कोटी रुपयांची वाढ होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

फास्टॅग बंधनकारक केवळ पैशांची बचत व महसुलात वाढ हे दोनच लाभ होणार नाहीत. तर गाड्या चालू ठेवून टोलनाक्यांवर थांबल्यामुळे वायुप्रदुषणात होणारी वाढही पुर्णपणे संपणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. टोल नाक्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगामुळे प्रवासाला होणाºया विलंबामध्येही लक्षणीय घट झाली आहे. फास्टॅगमार्फत दररोजची टोलवसुली १०४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.

इंडिगो विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या