28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमच्छिमारांच्या समर्थनार्थ फादर्स मैदानात

मच्छिमारांच्या समर्थनार्थ फादर्स मैदानात

एकमत ऑनलाईन

विझिंजम : केरळमधील विझिंजम येथील अदानी बंदर प्रकल्पाला होणारा विरोध तीव्र होत आहे. मच्छिमारांच्या समर्थनार्थ कोचीमधील अनेक चर्चच्या धर्मगुरूंनी आता मानवी साखळी करून निदर्शने केली आहेत. बांधकामादरम्यान किनारपट्टीच्या जमिनीचे नुकसान होत असल्याचा आरोप करत, मच्छिमारांचे पुनर्वसन आणि समुद्राच्या धूपावर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यातही शेकडो मच्छीमारांनी राज्याच्या राजधानीत मोठा मोर्चा काढला आणि डाव्या सरकारवर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. १ सप्टेंबर रोजी केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला अदानी बंदरांच्या चालू असलेल्या विंिझजम बंदर प्रकल्पाला पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. आंदोलकांनी बंदर परिसरात घुसू नये आणि बाहेर शांततेने आंदोलन करावे, असे आदेश पण न्यायालयाने दिले होते. तसेच सांगितले की बांधकामात अडथळा आणू नका.

आंदोलकांचा आरोप
आंदोलकांचा आरोप आहे की, या विझिंजम बंदराचा एक भाग म्हणून ग्रोईन बांधले जात असल्याचा आहे. त्यामुळे येत्या काळात मच्छीमारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या