16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयसावकाराच्या जाचाला कंटाळून अख्ख्या कुटुंबाने केली आत्महत्या

सावकाराच्या जाचाला कंटाळून अख्ख्या कुटुंबाने केली आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नवादा : कर्जात बुडाल्यानंतर सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील ५ जणांनी सामुहिक विष प्राशन करीत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
बिहारच्या नवादा येथे ही घटना घडली. केदार लाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री उशिरा पत्नी व ४ मुलांसह विष प्राशन केले. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. तर एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. विष प्राशन केल्यानंतर सर्वजण जमिनीवर तडफडत होते. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली आहे.

मृतांमध्ये ५० वर्षीय कुटुंबप्रमुख केदार लाल गुप्ता, त्यांची ४७ वर्षीय पत्नी अनिता कुमारी, मुलगा प्रिन्स (१६), मुलगी शबनम कुमारी (२०) आणि गुडिया कुमारी (१७) यांचा समावेश आहे. तर त्यांची आणखी एक मुलगी साक्षीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर पावापुरी येथे उपचार सुरू आहेत. साक्षीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या वडिलांनी १२ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. केदार लाल गुप्ता फळाचे दुकान चालवत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या