30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयव्यापारी महासंघानं 500 वस्तूंवर टाकला 'बहिष्कार'

व्यापारी महासंघानं 500 वस्तूंवर टाकला ‘बहिष्कार’

एकमत ऑनलाईन

पूर्व लडाखमधील गलवाण खोर्‍यातील लष्करी घडामोडींकडे लागलेले असताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कैटने चीनला व्यापारातून उत्तर देणारा निर्णय घेतला आहे. लडाखमध्ये चीन व भारतामध्ये सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कैटने चीनमध्ये (मेड इन चायना) तयार केल्या जाणार्‍या 500 वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्यक्ष ताबारेषेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कैट) चीनमध्ये तयार होणार्‍या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गलवाण खोर्‍यात सैनिकांवर करण्यात आलेल्या हल्ल्यावर देशभरातील व्यापार्‍यांनी टीका केली. संधी मिळेल तेव्हा चीन भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो.

चीनची ही भूमिका भारताच्या विरूद्ध असल्याचे सांगत व्यापारी महासंघाने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महासंघाने घेतली आहे. ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या अभियानातंर्गत मंगळवारी बहिष्कार टाकण्यात येणार्‍या 500 मेड इन चायना वस्तूंची यादी जारी केली आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया या निर्णयाविषयी बोलताना म्हणाले, सध्या चीनमधून भारतातील वार्षिक आयात 5.25 लाख कोटी रुपयांची आहे.

Read More  17 बंधारे पाण्याखाली : कोल्हापुरात तुफान पाऊस, पंचगंगेची पातळी 23 फुटांवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या