27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयलढाऊ राफेलचे 'हॅप्पी लँडिंग'

लढाऊ राफेलचे ‘हॅप्पी लँडिंग’

एकमत ऑनलाईन

राफेल लढावू विमान ताफ्याचे हरियाणा येथील अंबाला एअरबेस येथे लँडींग झाले. फ्रान्स येथे विशेष प्रशिक्षण घेतलेले भारतीय वैमानिक या विमानांसह भारतात दाखल झाले. या विमानांच्या आगमनामुळे भारतीय लष्करी शक्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताच्या लष्करी सेवेत आणि जगभरातील एकूणच लष्करी सामग्रमध्ये राफेल लढावू विमानेही अद्ययावत मानली जातात.

सोमवारी (दि.27.07.2020)  फ्रान्समधून ही 5 विमाने भारताच्या दिशेने रवाना झाली होती. अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने संयुक्त अरब अमिरातीच्या फ्रेंच तळावर उतरली. तेथे या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. फ्रान्समधून निघालेली राफेल फायटर विमाने हरयाणामधील अंबाला बेसवर उतरली आहेत. नौदलाने राफेलच्या वैमानिकांना ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राफेल विमाने कशी हाताळायची याबाबत या वैमानिकांना आणि त्यांच्या क्रू मेंबर्सच्या टीमला सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. फ्रान्सकडून भारताला एकूण 36 राफेल लढावू विमाने मिळणार आहेत. त्याबाबतचा करार उभय देशांमध्ये 2016 मध्येच झाला आहे.दोन्ही देशांमध्ये 59 हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे.

राफेल लढावू विमानांनी फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी उड्डाण भरले होते. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर या विमानांनी काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर या विमानांनी आज सकाळी पुन्हा उड्डाण भरले आणि ही विमाने भारतीय हवाई हद्दीत दाखल झाली. राफेल विमानांचा पहिल्या ताफ्यात एकूण पाच विमाने आहेत. यातील तीन विमाने सिंगल सीटर आहेत. तर दुसरी दोन डबल सिटर आहेत.

पंतप्रधान मोदींनी केलं राफेलचं स्वागत
पंतप्रधान मोदी यांनी लँडिंग चा व्हिडीओ शेअर करीत अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं.

मोदींनी संस्कृतमध्ये एक श्लोक ट्विट केला आहे
राष्ट्ररक्षासमं पुण्यं,
राष्ट्ररक्षासमं व्रतम्,
राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।।
नभः स्पृशं दीप्तम्.. स्वागतम्!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या