24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयडॉक्टरांवर हल्ले केल्यास तात्काळ गुन्हा दाखल करा

डॉक्टरांवर हल्ले केल्यास तात्काळ गुन्हा दाखल करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकट काळात डॉक्टरांवर हल्ले वाढले आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, यापुढे डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचा-यांवर हल्ले केल्यास संबंधितांविरोधात महामारी रोग अधिनियम २०२० अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी, असा आदेश केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे. यासंबंधी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे.

कोरोनाच्या संकट काळात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी महत्त्वाचे योगदान देत आहेत. मात्र, या काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांवर हल्ले वाढले आहेत. खरे तर डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र, त्यांच्यावरच रुग्णांचे नातेवाईक हल्ले करीत आहेत. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्यांना पत्र पाठविण्यात आले असून, त्यामध्ये डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचा-यांना धमकी किंवा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असेल, तर अशा कोणत्याही घटनांनी कर्मचा-यांचे खच्चीकरण होते आणि त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. याचा आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे अशा घटनांची वेळीच दखल घेऊन संबंधितांविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवावा आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, असे म्हटले आहे.

सद्यपरिस्थितीत हल्लेखोरांवर कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा आरोग्य कर्मचा-यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. त्यामुळे राज्य सरकारांनी वेळीच दक्षता बाळगून कारवाई केली पाहिजे आणि गरजेनुसार महामारी अधिनियमांच्या कलमांनुसार कारवाई करायला हवी, असेही म्हटले आहे.

सोशल मीडियावर नजर ठेवा
सोशल मीडियाच्या माध्यमातून अ्ननेकदा गैरसमज पसरवले जातात. तसेच माथी भडकवण्याचेही प्रकार होतात. त्यामुळे सोशल मीडियावरही बारकाव्याने नजर ठेवण्याचे आदेशही या पत्रात दिले आहेत. एवढेच नव्हे, तर रुग्णालयात कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण योगदानाचो पोस्टर लावले जावेत, असेही केंद्रीय गृहसचिवांनी सांगितले.

पाच वर्षे जेल, २ लाखांचा दंड
डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचा-यांवर हल्ले केल्यास किंवा धमकी दिल्यास महामारी अधिनियम २०२० मधील तरतुदीनुसार संबंधितांना ५ वर्षे तुरुंगवास आणि २ लाखांचा दंड होऊ शकतो. एवढेच नव्हे, तर हल्ल्यात एखादी व्यक्ती गंभीर जखमी झाली किंवा शारीरिक हानी झाल्यास संबंधिताला ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि पाच लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.

सत्तेचा केंद्रबिंदू सरकतोय!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या