21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयअखेर येदियुरप्पा यांचा राजीनामा

अखेर येदियुरप्पा यांचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मागच्या एक-दोन महिन्यांपासून सुरु असलेली चर्चा अखेर खरी ठरली असून, बी.एस. येदियुरप्पा यांनी सोमवार दि़ २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. येदियुरप्पा हे कर्नाटकात सर्वात प्रभावशाली असलेल्या लिंगायत समाजातून येतात. त्यांना पुन्हा एकदा पाचवर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. येदियुरप्पा यांचा राजकारणातील मुख्यमंत्रीपदाचा प्रवास सहज-सोपा नाही. समाज कल्याण खात्यात एक साधा कारकून म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली होती.

मुख्यमंत्री म्हणून कर्नाटकाची सेवा करण्याची मला दोन वर्ष संधी दिली, त्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा आभारी आहे. येदियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बी. एस. येदियुरप्पा यांचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मंजूर केला आहे. बीएस येडियुरप्पा हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पुढील व्यवस्था होईपर्यंत काम पाहणार आहेत.

राजीनाम्यासाठी दबाब नाही
कर्नाटक आणि माझ्या मतदारसंघातील जनतेचा मी आभारी आहे. मी दोन दिवसांपूर्वी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यपालांनी माझा राजीनामा स्वीकारला आहे, असे येडियुरप्पा म्हणाले. राजीनामा देण्यासाठी कोणी माझ्यावर दबाव टाकला नाही. मी स्वत:हून राजीनामा दिला, जेणेकरुन दुस-याला मुख्यमंत्री बनता येईल. पुढच्या निवडणुकीत भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मी काम करणार आहे, असे येदियुरप्पा यांनी सांगितले.

कोणाचेही नाव सुचविले नाही : येदियुरप्पा
माझ्यानंतर कोणाला मुख्यमंत्री बनवावे? या संदर्भात मी कोणाचेही नाव सुचवलेले नाही, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. भाजपाकडून लवकरच कर्नाटकात निरीक्षक पाठवण्यात येतील. पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्व पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? या बद्दल चर्चा करुन निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

शोधमोहीम थांबविली; तळीयेत ८२ मृत्युमुखी, ५० मृतदेह बाहेर, अद्याप ३२ बेपत्ताच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या