19.6 C
Latur
Monday, January 25, 2021
Home राष्ट्रीय प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांविरोधात एफआयआर

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणांविरोधात एफआयआर

एकमत ऑनलाईन

लखनौ : फ्रान्समध्ये घडलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात लखनौ येथील हजरतगंज पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राणा यांनी आपल्या वक्तव्यात फ्रान्समध्ये घडलेल्या घटनेला योग्य असे म्हटले होते. यावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी धार्मिक भावना भडकवण्याच्या आरोपाखाली मुनव्वर राणा यांच्या विरोधात एफआयरची नोंद केली आहे.

मोहम्मद पैगंबराच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादातून फ्रान्समध्ये रक्तपात घडला होता. काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची हत्या करण्यात आल्यानंतर फ्रान्समधील नीस शहरात एका चर्चेमध्ये घुसलेल्या हल्लेखोरांने तिघांचा जीव घेतला होता. व्यंगचित्र आणि त्यानंतर झालेल्या हल्ल्याचे जगभर पडसाद उमटत असताना मुनव्वर राणा यांनी हल्ल्याचे समर्थन केले होते.

उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा विरोधात कलम १५३(ए), २९५ (ए), २९८, ५०५ सह अन्य कलामांतर्गत खटला दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत, भारत या लढाईमध्ये फ्रान्ससोबत उभा असल्याचे म्हटले होते़ त्यावरही मुनव्वर राणा यांनी भाष्य केले होते. राफेलमुळे पंतप्रधानांना असं बोलावं लागत आहे, असे त्यांनी म्हटले होते.

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करण्याबाबतच्या अर्जावर लवकरच निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या