16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयप्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात एफआयआर

प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात एफआयआर

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी ठार झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी गेल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. कालपासून त्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाल्यामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात एसएचओ हरगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लाखीमपूर खेरीमध्ये मौर्य यांचा ताफा जात असताना शेतक-यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. त्यानंतर दोन गाड्या शेतक-यांच्या आंदोलनामध्ये घुसल्या आणि शेतक-यांना चिरडले. यामध्ये चार शेतक-यांचा तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील वातावरण तापले असून अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देण्यासाठी उत्तर प्रदेशकडे धाव घेतली. यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधींचा देखील समावेश होता.

१४४ लागू असताना निदर्शने
प्रियांका गांधी यांना सितापूर येथील पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रियांका गांधींना सोडण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने सितापूर येथे निदर्शने केली. कलम १४४ देखील लागू असताना त्यांनी निदर्शने चालूच ठेवली. त्यामुळे प्रियांका गांधींसह दीपेंद्र हुडा, अजयकुमार लल्लू यांच्या विरोधात शांतता भंग करÞण्याच्या आरोपाखाली सितापूर येथील पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री बघेल यांचे विमानतळावरच आंदोलन
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी देखील प्रियांका गांधींना पाठींबा देण्यासाठी उत्तर प्रदेश गाठले. मात्र, त्यांना प्रियांका गांधींना ठेवण्यात आलेल्या सितापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यांना विमानतळावरच रोखून धरण्यात आले. त्याबाबत भूपेंद्र बघेल यांनी निषेध व्यक्त केला आहे.

प्रियांका गांधींची अटक बेकायदेशीर : चिदंबरम
प्रियंका यांना कायदेशीर बाबींचे पालन न करता ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही आता या घटनेचा निषेध केला. प्रियंका गांधी यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई केल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. प्रियंका गांधींवर झालेली अटकेची कारवाई पुर्णपणे बेकायदेशीर आणि लज्जास्पद आहे. त्यांना सुर्योदयापूर्वीच रात्री ४:३० वाजता पुरूष अधिका-यांकडून अटक झाली. तसेच, त्यांना अजूनही न्यायालयात हजर करण्यात आलेले नाही, असे चिदंबरम यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या