28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय कोविड सेंटरला आग; १० जण मृत्युमुखी

कोविड सेंटरला आग; १० जण मृत्युमुखी

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत गुदमरून मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १० वर पोहोचला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे.

अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर काम करीत ही आग विझवली. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. विजयवाडाचे पोलिस उपायुक्त विक्रांत पाटील यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.

आग लागली त्यावेळी स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्मचारी होते. घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यात ३० जणांना वाचविण्यात आले. दोन कर्मचा-यांनी इमारतीवरून उड्या मारल्या.

रुग्णांनी ओलांडला २१ लाखांचा टप्पा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या