पाटणा : डीएमयू रेल्वेच्या इंजिनला आग लागलीे. ही दुर्घटना आज रविवारी भेलवा रेल्वे स्थानकाजवळ पहाटे घडलीे. ही रेल्वे रक्सोलहून नारकटियागंजला जात होती. आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही.
सर्व रेल्वेप्रवासी सुरक्षित आहेत. इंजिनला लागलेली आग इतरत्र पसरली नाही. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. रेल्वे इंजिनला अचानक आग लागली? याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.