जयपूर : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये फटक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
फटाक्यांमधून निघणा-या विषारी वायूपासून कोरोनाबाधित रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, राज्यात फटक्यांची विक्री आणि आतिषबाजीवर बंदी घालण्याचे, तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेली व धूर सोडणा-या वाहनांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, असे ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे.
जर्मनी, यूके, फ्रांस, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. काही देशांना तर पुन्हा लॉकडाउन सुरू करावा लागला आहे. आपल्याकडे देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे, असेही गेहलोत यांनी सांगितले आहे.
दिसता क्षणी गोळ्या घाला – कोरोनाग्रस्त शत्रुवरून किम जोंग-उनचा आदेश