24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत गोळीबार, एकाचा मृत्यू

दिल्लीत गोळीबार, एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.
आरोपींनी अनेकवेळा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाली. या गोळीबारातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. देवळीच्या राजू पार्कजवळ पोलिसांना रक्ताचे डाग आणि सहा रिकामी काडतुसे रस्त्यावर पडलेली आढळून आली. पोलिस उपायुक्त (दक्षिण) बेनिता मेरी जॅकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक कॉलनी, देवळी येथील रहिवासी कपिल पनवार यांना मृत घोषित करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या