नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदीराच्या निर्मितीसाठी निधी समर्पण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मोहिमेच्या माध्यमातून १२ कोटींहून अधिक कुटुंबांना संपर्क साधला जाणार आहे. मोहिमेची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वात अगोदर ५ लाख एक रुपयांचा निधी समर्पित करत करण्यात आली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांच्यासहीत विश्व हिंदू परिषदेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सकाळी ११ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एक लाख रुपयांचे दान या निधीत जमा केले आहे. अहमदाबादचे हिरे व्यापारी गोविंद ढोढाकिया यांनी ११ कोटी रुपयांचे दान राम मंदिरासाठी दिले आहे.
यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्यांविना