16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयभाजपची पहिली यादी जाहीर

भाजपची पहिली यादी जाहीर

एकमत ऑनलाईन

गांधीनगर : गुजरातमध्ये होणा-या आगामी दोन टप्प्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या टप्प्यासाठी १६० उमेदवारांची नावे जाहीर केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दुसरीकडे भाजपने जामनगर उत्तरमधून क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या पत्नी रिवाबा यांना तिकीट दिले आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी मजुरा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

हार्दिक पटेल यांना विरमगाममधून तिकीट
काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना तिकीट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

३८ आमदारांची तिकिटे कापली
भाजपने गुजरातमधील ६९ विद्यमान आमदारांची तिकिटे परत केली, म्हणजेच त्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर ३८ आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. एकूण १६० उमेदवारांपैकी ३८ नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे.

रुपाणी निवडणूक लढविणार नाहीत
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे नाव भाजपच्या या यादीत नाही. रुपाणी यांच्या जागी डॉ.दर्शिता शाह राजकोट पश्चिममधून निवडणूक लढविणार आहेत. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी, राजकोट पश्चिम मतदारसंघातील तत्कालीन आमदार विजय रुपाणी यांना हायकमांडने आनंदीबेन पटेल यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यास सांगितले होते. पाच वर्षांनंतर, २०२१ च्या निवडणुकीच्या आधी, आनंदीबेन पटेल यांच्याप्रमाणे रुपाणी यांनाही पद सोडण्यास सांगण्यात आले. त्यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दरम्यान, आताही रुपाणी यांना तिकीटही दिलेले नाही. मात्र, रुपाणी यांनी नुकताच दावा केला होता की, पक्षाने सांगितले तरच या जागेवरून निवडणूक लढवेन असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या