25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील पहिली मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच

देशातील पहिली मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गासोबतच मंकीपॉक्स हा आजारही हातपाय पसरताना दिसत आहे. मंकीपॉक्स विषाणूची ओळख पटण्यासाठी आधी प्रयोगशाळेत नमुने पाठवावे लागत होते. मात्र, आता यासाठी सोपा मार्ग सापडला आहे. पहिले स्वदेशी मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आले आहे. ट्रांसएशिया एर्बा मंकीपॉक्स आरटी पीसीआर किट अतिशय संवेदनशील असून हाताळायला फार सोपे आहे.

त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांचा अहवाल लवकर येऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजयकुमार सुद यांच्या हस्ते पहिले स्वदेशी मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट लाँच करण्यात आले आहे. ट्रांसएशिया एर्बा मेडिकल्स या फार्मा कंपनीने हे मंकीपॉक्स आरटीपीसीआर किट तयार केले आहे.

मंकीपॉक्समुळे आरोग्य मंत्रालय अ‍ॅलर्ट
देशात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय अ‍ॅलर्ट मोडवर आले आहे. यानंतर आता केंद्र सरकारकडून पहिले भारतीय मंकीपॉक्स टेस्ट किट लाँच करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील मेडटेक झोन येथे शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी हे किट लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे आता मंकीपॉक्स विषाणू संसर्ग झालेल्यांचे निदान होणे सोपे होणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळी उपचार मिळून मृत्यूचा धोकाही कमी होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या