24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण

दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत पुढच्या काळात कोरोनामुळे भयंकर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडे पाच लाख कोरोना रुग्ण होतील, असा इशारा उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिला आहे. दिल्लीत सामूहिक संसर्ग नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. पण दिल्लीत सामूहिक संसर्गला सुरुवात झाली आहे, असे दिल्ली सरकारचे म्हणणे असल्याचे सिसोदिया म्हणाले.

१५ जूनपर्यंत दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ही ४४ हजारापर्यंत जाऊ शकते. हा आकडा ३० जूनपर्यंत वाढून १ लाखपर्यंत जाऊ शकतो आणि १५ जुलैपर्यंत दिल्लीत कोरोनाचे सव्वा लाख रुग्ण असतील. तर ३१ जुलैपर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर जाईल, असे सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार झाले पाहिजे. पण दिल्ली सरकारचा हा निर्णय नायब राज्यपालांनी रद्द केला. यामुळे दिल्लीकरांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. आम्ही राज्यपाल अनिल बैजल यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह केला. पण त्यांनी नकार दिला, असे सिसोदिया यांनी सांगितले.

दिल्लीला सामूहिक संसर्गाचा धोका
कोरोना व्हायरसमुळे दिल्लीकरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. चाचणी केल्यावर बहुतेक नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यामुळे दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिल्ली सोमवारी कोरोना चाचणीत २७ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही ३० हजारांवरजवळ पोहोचली आहे.

दिल्लीत गेल्या २४ तासांत ३७०० जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात १००७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. म्हणजेच एकूण चाचण्यांपैकी २७ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळलेत. गेल्या आठवड्यात हा दर २६ टक्के इतका होता.
दिल्लीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९,९४३ इतकी झाली आहे.

Read More  लातूर जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह; तर एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित

यापैकी ११, ३५७ जण कोरोनामुक्त झालेत. तर १७ हजार ७१२ जणांवर उपचार सुरू आहे. दिल्लीत आता सामूहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. दिल्लीत सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे, असे अनेक जण आहेत ज्यांचा कुठलाही सोर्स नाही आहे़ जे कुणाच्या संपर्कात आलेले नाही आहेत़ आता केंद्र सरकारने ही बाब मान्य करायला हवी आहे. दिल्लीतील जवळपास निम्म्या रुग्णांचा कुठलाही सोर्स आढळून आलेला नाही, असे एम्सचे संचालकांनी सांगितल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले.

दिल्लीत १८३ कोरोना हॉटस्पॉट
दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे करोनाचे हॉटस्पॉटही वाढत आहेत. दिल्लीतील कोरोनाच्या हॉटस्पॉटची संख्या वाढून १८३ इतकी झाली आहे. रविवारी दिल्लीतील हॉटस्पॉटची संख्या १६९ इतकी होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या