तहरी गरवाल (उत्तराखंड) : वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जणांचा काल मृत्यू झाला. हा अपघात घनसाली-गुट्टूवरील तेहरी गरवालमध्ये झाला. वाहनात आठ लोक होते.
जखमी झालेल्या तीन जणांवर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती अधिका-याने सांगितले. या अगोदर गेल्या रविवारी दरीत वाहन कोसळून २६ जणांचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले होते. हे प्रवासी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील होते.