28.2 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयआसाम, मेघालयात पुराचे थैमान

आसाम, मेघालयात पुराचे थैमान

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : मुसळधार पावसामुळे आसाम आणि मेघालयमध्ये हाहाकार उडाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे दोन्ही राज्यांमध्ये दोन दिवसांत ३१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १८ लाख लोकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे आसाम आणि मेघालयमध्ये हाहाकार उडाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे दोन्ही राज्यांमध्ये दोन दिवसांत ३१ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १८ लाख लोकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

मेघालयातील मौसिनराम आणि चेरापुंजी येथे विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. चेरापुंजी येथे ९७३ मिलिमीटर पाऊस पडला. तर मौसिनराम येथे १००३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १९९५ नंतर प्रथमच या भागात एवढा पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे आसाममधील ३ हजार गावे प्रभावित झाली आहेत. ब्रह्मपुत्रा, गौरांग, कोपिली, मानस इत्यादी नद्यांना पूर आला आहे.

होजई जिल्ह्यात पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी नेणारी एक बोट उलटून ३ मुलांचा मृत्यू झाला. बोटीत २४ जण होते. त्यापैकी २१ जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, मुलांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या