30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeराष्ट्रीयऔषध आणि औषध देण्याची वेळ पाळा - डॉ. गुलेरिया

औषध आणि औषध देण्याची वेळ पाळा – डॉ. गुलेरिया

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग सुरु होऊन आता जवळपास वर्ष पुर्ण होऊन दुसरे वर्ष सुरु झाले आहे. अशात भारतातील आरोग्यक्षेत्राला भरपूर अनुभव मिळाला आहे. अनुभवानूसार कोरोनाला रोखण्यासाठी दोन उपाय महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे औषध आणि औषध देण्याची वेळ, ती पाळा अशी सूचना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत आहे. दुसरीकडे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. मात्र काही लस घेतल्यावर निर्धास्त राहिल्यास लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे लसीकरणानंतरही नागरिकांनी स्वेच्छेने सर्व नियम पाळावेत, असे आवाहनही गुलेरिया यांनी केले आहे.

गुलेरिया म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी दोन उपाय महत्त्वपूर्ण आहेत ते म्हणजे औषध आणि औषध देण्याची वेळ. जर तुम्ही औषध लवकर दिले किंवा उशिरा दिले तर त्यातून फायदा होण्याऐवजी नुकसान होईल. अनेक औषधांना एकत्र करून दिल्यास अशा प्रकारामुळे रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
स्टेरॉईडही वेळेवरच द्यावीत

कोरोना रुग्णांना स्टेरॉइड देणे फायदेशीर असल्याचे रिकव्हरी ट्रायलमधून दिसून आले आहे. मात्र ऑक्सिजनची पातळी कमी होण्यापूर्वी स्टेरॉइड दिल्याच त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. तसेच वेळेआधीच स्टेरॉइड देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर अधिक असल्याचेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन ही काही जादुची गोळी नव्हे. एखाद्या व्यक्तीला लक्षणेच नसतील किंवा सौम्य असतील तर त्याला हे इंजेक्शन देऊन उपयोग नाही.

तसेच रुग्णाला खूपच त्रास व्हायला लागल्यानंतर हे इंजेक्शन दिल्यावरही त्याचा काहीही उपयोग होणार नाही. उलट जे कोरोनाबाधित रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर आहेत. तसेच ज्या रुग्णांच्या छातीच्या एक्स-रेमध्ये आणि सीटीस्कॅनमध्ये काही संसर्ग दाखवला असेल तर अशा रुग्णांनाच रेमडेसिव्हीरचा डोस देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना लवकरच मिळणार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या