32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयदेशातील खाद्य सुरक्षा धोक्यात!

देशातील खाद्य सुरक्षा धोक्यात!

एकमत ऑनलाईन

पतियाळा : मोदी सरकार कृषी कायद्यांच्या माध्यमातून देशातील खाद्य सुरक्षेची संरचना नष्ट करण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे खाद्य सुरक्षा धोक्यात आली आहे. सरकारने सर्व देशालाच मारले आहे, मग हाथरस प्रकरणावरून मला धक्काबुक्की सामान्य बाब असल्याचे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल सुरू असून पंजाबात असलेले राहुल गांधी आज हरयाणात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे हे अभियान मोदी सरकारच्या तीन काळ्या कायद्यांविरोधात आहे. मोदी सरकारने प्रथम नोटाबंदी केली. त्यानंतर जीएसटी आणि आता हे तीन कृषी कायदे आणण्याच्या प्रयत्नांत हे सरकार आहे. आम्ही पंजाब आणि हरयाणातील शेतक-यांची लढाई लढत असल्याचे राहुल म्हणाले.

राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारने नोटबंदी करत गरिबांवर हल्ला केला. जीएसटी आणत त्यांनी छोट्या व्यवसायिकांवर हल्ला केला. त्यानंतर अचानक लॉकडाउन केला आणि या देशातील गरीब रस्त्यावर मेला. जेव्हा मी करोनाबाबत काही मुद्दे मांडले तेव्हा माझी चेष्टा केली केली. २०-२१ दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई संपेल असे एक व्यक्ती म्हणत आहे, त्या व्यक्तीला हे माहीत नाही की करोना काय आहे.

हाथरसवरून सरकारला घेरले
हाथरसच्या घटनेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरले. संपूर्ण देशालाच मारले जात आहे, मग मला धक्का मारणे ही मोठी गोष्ट नाही, असे राहुल गांधी म्हणाले. एखाद्याच्या मुलाची किंवा मुलीची हत्या केली जाते, त्यानंतर आई-वडिलांना बंद केले जाते.

पंतप्रधानांना देखील समजत नाहीत कृषी कायदे
मला असे वाटते की स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कृषी कायदे काय आहेत हे समजलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ६ महिन्यांनंतर देशात ना रोजगार असेल ना जेवण. याचे कारण म्हणजे संरचना तोडण्यात आलेली आहे. मात्र मी जे काही बोलत आह. त्याची चेष्टा उडवली जाईल.

मोदी उद्योगपतींचा मार्ग मोकळा करतायेत
मोदी सरकारने या कायद्यांच्या आधारे सर्वकाही तोडून टाकले आहे. आज बाजारांची संख्या कमी आहेत, काही ठिकाणी भ्रष्टाचार आहे, मात्र किल्लाच जर तोडून टाकला तर मग शेतकरी वाचणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ अंबानी-अदानी यांच्यासाठी मार्ग स्वच्छ करण्याचे काम करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.

आघाडी सरकार व मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार बोगस सोशल मेडिया अकाउंट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या