22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयअदानींसाठी एअर इंडियाचे कर्मचारी होणार बेघर

अदानींसाठी एअर इंडियाचे कर्मचारी होणार बेघर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई आणि दिल्लीतील कर्मचा-यांनी येत्या २६ जुलैपूर्वी वसाहती सोडाव्यात, असे एअर इंडिया प्रशासनाने वसाहतीतील कर्मचा-यांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांनंतर एअर इंडियाच्या कर्मचा-यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

एअर इंडियाचे काही महिन्यांपूर्वी खासगीकरण करण्यात आले होते. एअर इंडियाच्या वसाहती कर्मचा-यांनी सोडून जावे यासाठी प्रशासनाने कर्मचा-यांच्या मागे तगादा लावला आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचा-यांनी आंदोलनही केले होते. आता, वसाहती खाली करण्यासाठी आलेल्या नोटिसीने कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय संतप्त आहेत, मात्र निवृत्तीपूर्वी घर न सोडण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत.
एअर इंडिया प्रशासनाविरोधात कर्मचारी व कुटुंबीयांनी गेल्या महिन्यात मोर्चा देखील काढला होता.

अदानींकडे जमिनीचा ताबा
केंद्र सरकारने त्या वसाहतींची जमीन नियमबा पद्धतीने अदानी समूहाच्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडकडे सोपवली असा आरोप कर्मचा-यांनी केला आहे. अदानी समूहाने या वसाहतींमधील रहिवाशांना व्यवस्थापनाच्या माध्यमातून नोटिसा बजावल्याचा आरोप होत आहे.

एअर इंडियाच्या किती कर्मचा-यांचे वास्तव्य?
दिल्लीप्रमाणे कालिना येथील एअर इंडियाच्या जमिनीवर एअर इंडियातील इंजिनीयर्स , ग्राऊंड स्टाफ आणि कर्मचा-यांसाठी १९५५ मध्ये चार वसाहती उभारण्यात आल्या होत्या. त्या वसाहतींमध्ये १६०० घरे आहेत. तिथे राहणा-या कर्मचा-यांच्या वेतनातून घरभाडे घेतले जाते.

एअर इंडियाने काढलेल्या पत्रकात काय म्हटले?
एअर इंडियाने १८ मे रोजी काढलेल्या पत्रकानुसार , हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे कर्मचारी वसाहतीतील घरांचा शांततापूर्ण ताबा घेण्यासाठी २६ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी वसाहतीत वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आल्यास सामान्य भोगवटा शुल्काच्या समतुल्य दंड आणि बाजारमूल्याच्या दुप्पट भाडे आकारले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या