24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयजबरदस्तीने धर्मांतर; महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न

जबरदस्तीने धर्मांतर; महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

चेन्नई : धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत एका महिलेने स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. या महिलेने रामनाथपुरम जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. महिलेला तिथे उपस्थित असलेल्या पोलिस आणि अधिका-यांनी वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. वलरमथी असे या महिलेचे नाव आहे.

पचेरी गावातील वलरमथी नावाच्या या महिलेने सांगितले की, तिच्या गावातील देवदास नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून तिला आणि तिच्या कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. धर्मांतर करण्यास नकार दिल्याने देवदास आणि त्याचे कुटुंबीय २०१९ पासून तिचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ करत असल्याचा आरोप तिने केला. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच गावात अनेकांचे धर्मांतर झाल्याचा दावाही तिने केला आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, १५ मे रोजी वलरमथी जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. त्यावेळी अधिका-यांनी लोकांच्या तक्रारी आणि प्रश्न ऐकत असताना तिने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांनी आणि नागरिकांनी तिला रोखले. यावेळी ती म्हणाली की, २०१९ पासून देवदास आणि त्याचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी माझा छळ करत आहेत. देवदासच्या कुटुंबीयांनी माझ्या घरचा रस्ता बंद केला आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले.

आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात आमच्या बाजूने निकाल लागल्याने त्याने गाडीने चिरडून मला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मी पोलिसांकडे गेले. पोलिसांनी कारवाई करण्याचे वचन दिले परंतु कारवाई केली नाही. त्यांनी माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांनी त्याला वाचवले. देवदासमुळे गावात जगणे कठीण झाले आहे, अशी माहिती या महिलेने दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या